एमक्युआर कंपनीतर्फे विशेष विद्यार्थ्यांना मदत

0

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ‘स्वाभिमान’ या विशेष मुलांसाठी सुरू केलेल्या सेंटरला एमक्युआर कंपनीतर्फे दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली, तर केजीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.

औषध निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या एमक्युआर कंपनीने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे विशेष मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या स्वाभिमान सेंटरसाठी दोन लाखांचा धनादेश कार्यकारी व्यवस्थापक सुनील मेहता यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, उपाध्याक्ष अभय सावंत, सदस्य मनिष आनंद, कार्तिकी हिरवकर आदी उपस्थित होते. तसेच कंपनीच्या एचआर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश नायर, कार्यकारी व्यवस्थापक सुशील वर्मा, सीएसआर प्रमुख गिरीश घनवट यांनी सदस्य मनिष आनंद यांच्या उपस्थितीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्नल भगत इंग्रजी माध्य्म शाळा, मोलोदिना स्कूल, आर.आर. राणे या शाळांमधील केजीच्या 400 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यामध्ये दप्तर, वह्या, कंपास, डब्बा, पाण्याची बाटली असे साहित्य देण्यात आले. तसेच कंपनीतर्फे बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलला दरवर्षी 25 लाख रुपये किमतीची औषधे देण्यात येतात, अशी माहिती आनंद यांनी दिली.