वडगाव- एम्प्रेस गार्डन’च्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थानासाठी इमारती बांधण्याचा घाट सरकारने घेतला आहे. गार्डन वाचविण्यासाठी वडगाव शेरीतील 350 विद्यार्थ्यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे, एम्प्रेस गार्डन वाचवण्यासाठी घातले साकडे घातले आहेत.
सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी एम्प्रेस गार्डन आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येऊन एम्प्रेस गार्डन बचाव समिती’ स्थापना केली आहे. सरकारी अधिकार्यांच्या निवासासाठी इमारती बांधण्याची योजना रद्द करावी’, अशी मागणी करणारी सुमारे 25 हजार पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी समितीमार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी, उद्यानात भेट देण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.