नवी दिल्ली: दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागली आहे. रुग्णालयाचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समोर आले आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमरजन्सी वॉर्डजवळ ही आग लागली आहे. तसेच रूग्णालायता कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हेदेखील याच रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच या ठिकाणी अनेक बडे नेतेही त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी येत आहेत.