एम.आय.टी. ग्रंथालय माहितीशास्त्राची राज्यस्त्ररीय कार्यशाळा पडली पार

0

आळंदी: एम.आय.टी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्यावतीने दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयातील माहितीशास्त्रावर आधारीत ‘क्रीएटींग अ‍ॅन इस्ट्यिूशनल रिपॉझिटरी बाय युझिंग द स्पेस डिजीटल लायब्ररी सॉफ्टवेअर अँड स्मार्ट लायब्रेरीयन युजिंग गुगल टूल्स’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 49 ग्रंथपाल, ग्रंथालयीन कर्मचारी व ग्रंथालय माहितीशास्त्राचे विद्यार्थांनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदावला. पहिल्या दिवशी सॉफ्टटेक सोल्यूशन अँड सर्व्हिसचे व्यवस्थापक चेतन टाकसाळे, तांत्रिक व्यवस्थापक इद्रीश खान यांनी उपस्थित कर्मचार्‍यांना आणि विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. तसेच सर्वांच्या शंकांचे समाधान केले.

दुसर्‍या दिवशी खेतान कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रा.प्रल्हाद जाधव, यांनी गुगल टूल्स वापरून कसे काम करू शकता, यावर उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रात्यिक्षिकेही करून घेतली. सर्वांच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे देऊन वरील विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. प्रा.प्रल्हाद जाधव हे ग्रंथालय व्यवस्थापनातील एक नामवंत व्यक्तिमत्व असून ते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर विविध विषयाच्या ग्रंथालय माहितीशास्त्राच्या कार्यशाळा घेतात. नवनविन टेक्नोलॉजी विषयी माहिती देऊन त्याचा ग्रंथालयात कसा वापर करावा यावर नेहमीच मार्गदर्शन करत असतात. या कार्यशाळेसाठी संस्थेचे प्रचार्य, डॉ.बी.बी.वाफारे, ग्रंथपाल राहुल बाराथे, निलेश मते तसेच ग्रंथालयातील कर्मचारी, सदस्य सारिका पडवळ आणि सुनिता साबळे, टेक्निकल टीम, संस्थेचे शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने पार पडली. सूत्रसंचालन प्रा.अर्चना आहेर व प्रा.मंगेश भोपळे यांनी केले. ग्रंथपाल राहुल बाराथे यांनी आभार मानले.