एम एच एस एस हाय.व क महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्तआनंद मेळावा संपन्न

शिंदखेडा (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमधे पौष्टिक तृणधान्याविषयी जागरूकता वाढावी व या तृणधान्य सेवनाने त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार एम.एच. एस. एस हायस्कूल शिंदखेडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री टी .एन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री ए .वाय .बोरदे ,श्री डी .एस .माळी, श्री आर .पी .चौधरी,श्री एस.एन.नेरपगार,श्री व्ही एस माळी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आरोग्याला लाभदायक तृणधान्यावर आधारित पाककृती घरून तयार करून आणल्या व विक्री स्टॉलच्या माध्यमातून या पाककृतींचे आरोग्यदायक फायदे देखील सांगितले. कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी खरेदी करून आस्वादही घेतला कार्यक्रमांचे मार्गदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री आर .पी चौधरी यांनी केले .