नवी दिल्ली । आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणात दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळं गेल्या दोन वर्षांच्या काळात धोनीनं रायझिंग पुणेचं प्रतिनिधित्व केले. पण चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे आगामी आयपीएलमध्ये पुनरागमन होणार आहे. त्या वेळी धोनीचाही चेन्नई सुपर किंग्समध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजाही धोनीसोबत चेन्नईत परतणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या ठरावानुसार चेन्नई आणि राजस्थानला 2015 सालच्या संघातल्या पाच खेळाडूंना कायम राखण्याची मुभा देण्यात आली आहे.