शहादा । एम.के क्लब गणेश मंडळाला 32 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे मुकबधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, प्रा.दत्ता वाघ, अरुण चौधरी, राजेंद्र अग्रवाल, शाम जाधव आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.दत्ता वाघ यांनी अंत्यत उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मंडळाने कार्य हाती घेतले आहे. असा पायंडा सर्वच गणेश मंडळांनी घातला पाहिजे. सध्या गणेशोत्सवाला वेगळे वळण लागत आसून तरुणाई भरकटत चालल्याचे दिसून येते. मुकबधिर मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम मंडळाने केले असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष पाटील यांनी चांगला कार्यक्रम मंडळाने राबवला आहे. सध्या संस्कृतीचा विसर पडत चालला असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक विनोद चौधरी, विक्की चौधरी, राहुल चौधरी, सागर चौधरी, मयुर चौधरी, गजेंद्र चौधरी, चंद्रशेखर धोबी, श्रीकृष्ण शिनकर, निखील मराठे, उमेश चौधरी, विजय चौधरी, सरजू चौधरी, भैय्या चौधरी, मनोज गवळी, प्रशांत कदम, विजू अहिरे, स्वप्निल चौधरी, बंटी चौधरी आदींनी परिश्रम घेतले.