एम.जे.अकबरांचा राजीनाम्यास नकार देत परराष्ट्र विभागाच्या बैठकीला हजरी

0

नवी दिल्ली-केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर दहा महिला पत्रकारांनी चळवळीत लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत होती. काल ते नायजेरियाहून परतल्यानंतर त्यांनी ई-मेलवर राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. मात्र नंतर त्यांनी स्वत: राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. तसेच आज त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत बैठकीला देखील हजेरी लावली. त्यामुळे ते राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.