एरंडोल। तालुक्यातील कासोदा येथील महेश हिरालाल चौधरी हे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची आय.पी.एस.अधिकारी म्हणुन निवड झाल्याबद्दल त्यांचा एरंडोल तालुका तेली समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महेश चौधरी हे निवृत्त पोलीस कर्मचारी हिरालाल चौधरी यांचे पुत्र असुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मविश्वास,जिद्द,मेहनत व चिकाटीच्या बळावर त्यांनी यश प्राप्त केले आहे. महेश चौधरी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल एरंडोल तालुका तेली समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
परीक्षेविषयी भीती बाळगू नये- महेश चौधरी
यावेळी अशोक चौधरी यांनी कासोद्या सारख्या ग्रामीण भागातल्या महेश चौधरी यांनी मिळविलेले यश युवकांना व समाजाला प्रेरणा देणारे असून आत्मविश्वास असल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळु शकते. हे महेशने दाखवून दिले असल्याचे सांगितले. यावेळी आय.पी.एस.अधिकारी म्हणुन निवड झालेले महेश चौधरी यांनी परीक्षेबाबत केलेल्या अभ्यासाची माहिती दिली. यावेळी तेली समाजाचे तालुकाध्यक्ष निंबा चौधरी, श्रीकृष्ण ऑईल मिलचे संचालक अनिल चौधरी यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.