एरंडोल – भरधाव वेगाने जाणार्या आयशरने समोरून येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच परिवारातील आई , वडील व मुलगी हे तिघे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर पद्मालय हॉस्पिटल जवळ झाला. शेख गायसोद्दीन शेख अलौद्दीन (45),परवीन बी गायसोद्दीन (40) व तमन्ना बी गायसोद्दीन (9), अशी मृतांची नावे आहे. सर्व एकाच परिवारातील असुन जळगाव येथील हुडको परिसरातील रहिवाशी असल्याचे समजते. जळगाव येथून शेख कुटुंबीय अपे रिक्षा क्र एम.एच.19 व्ही 7356 ने कासोदा येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते.एरंडोल पासुन केवळ एक किलो मिटर असलेल्या पद्मालय हॉस्पिटल जवळ समोरुन भरधाव वेगाने येणार्या आयशरने पजो रिक्षाला समोरुन धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला.