एरंडोल- अंजनी नदीपात्रात पडल्याने 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. कुंभारवाडा भागातील नदीपात्रात एका इसमाचे प्रेत नदीत तरंगत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली. एरंडोल पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनोळखी इसमाची ओळख अद्यापही पटली नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.