Shocking ! Gas leak in Bathroom : Death of Erandole Minor एरंडोल : शहरातील रेणुका नगरात अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने गुदमरून साई उर्फ यश वासुदेव पाटील (16) या मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
गॅस गळतीमुळे जागीच झाला मृत्यू
एरंडोल शहरातील रा.ती.काबरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त वार्यासारखे शहरात पसरले असता नागरीकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, मयत यश हा रेणुका नगरातील रहिवासी व काबरे विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक व्ही.टी.पाटील यांचा मुलगा तर शिवसेना (उ.बा. ठा.) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा पुतण्या होय.