एरंडोलला वयोवृद्ध महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

Erandole molested an elderly woman : a case against one  एरंडोल : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या वृद्धेला जातीवाचक शिविगाळ करीत विनयभंग करण्यात आला व मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयीत उत्तम शिवराम शिरवाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करीत केला विनयभंग
मंगळवार, 6 डिसेंबर रोजी पीडीत 65 वर्षीय वृद्धेने आरोपी उत्तम शिरवाणी याच्याकडे घराची चाबी मागितली असता त्यावरून त्याने लाथा-बुक्क्याने मारहाण केली तसेच पीडीतेने विरोध केल्यानंतर हात धरून तिच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.