एरंडोल। येथे अन्न सुरक्षा अधिकार्याच्या पथकाने मंगळवारी, 9 मार्च रोजी दुपारी 1.40वाजेच्या सुमारास आनंद नगर येथे गोदामावर धाड टाकून 44 हजार 160 रुपयांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, संशयित आरोपी विजय भिका चौधरी याने सरकारी आदेशाचे उल्लंघन करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा स्वतःच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग 5 गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 33/21 भादंवि कलम 328, 188, 272, 273 सह कलम अन्नसुरक्षा मानके कायदा 206 मधील कलम सहवाचा कलम 30 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत आहे.