एरंडोलसह पारोळ्यात पहेलवान पूत्र ग्रुपच्या शाखेचे उद्घाटन

0

समाज एकत्रीकरणासह बेरोजगारांना रोजगार देणे हाच उद्देश -संतोष बारसे

भुसावळ- पहेलवान पुत्र ग्रुपच्या शाखांचे एरंडोलसह पारोळा तसेच टोळी गावात माजी नगरसेवक तथा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारसे म्हणाले की, प्रत्येक समाजाचे संघटन व्हावे, शिक्षणापासून वंचित असलेली बालके शिक्षणाच्या प्रवाहात यावीत तसेच बेरोजगारांच्या हातांना काम देण्यासाठी आपली धडपड असून त्यानुषंगाने गाव तेथे शाखा उघडण्याचा आपला मानस आहे. समाजाचे आपणही देणे लागतो या भावनेतून आपले सामाजिक कार्य सुरू आहे. कुठल्याही समाजावर अन्याय व्हायला नको ही आपली भूमिका असून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण यापुढे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी विक्की आबा जाधव होते. याप्रसंगी रामभय्या कडोसे, अर्जुनभय्या जावडे, पापाभाई वाघरे, आशू पोहल, चेतन भैय्या संकत, नितीन भय्या जावडे, चंदन घारू, विजय पवार, विशाल पवार, सागर पारोचे, मनोज मोरे, विजय बशीरे, अतुल आबा थोरात, बबलू ठाकुर, ओम चावरीया, गोपी हसकर तसेच पहेलवान पूत्र ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.