एरंडोल। भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या समर्थकांनी स्थापन केलेल्या अनिलभाऊ चौधरी परिवर्तन मंचच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणपोया सुरु केल्यामुळे नागरिकाना दिलासा मिळाला आहे. अनिलभाऊ चौधरी परिवर्तन मंचच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात म्हसावद नाका परिसर, शिवाजी महाराज चौक, मरिमाता मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच कासोद्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणपोया सुरु केल्यामुळे नागरिकाना दिलासा मिळाला आहे. म्हसावद नाक्याजवळ सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेविका हर्षाली महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष यांच्याहस्ते उद्घाटन
शिवाजी महाराज चौकात सुरु करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र नागडेकर यांचेहस्ते मरिमाता मंदिर परिसरातील पाणपोईचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्याहस्ते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील पाणपोईचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र महाजन, उपनगराध्यक्ष जाहीरोद्दिन कासम, माजी नगरसेवक नथ्थू चौधरी, संजय लोहार, नाना महाजन, उमेश महाजन, सोनु ठाकुर, प्रमोद महाजन, नितीन चौधरी यांचेसह मंचचे पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सर्व पांणपोयांवर शुध्द व थंड पाणी वाटप केले जात असल्यामुळे नारीकानी समाधान व्यक्त करून मंचच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करा – चौधरी
सद्यस्थितीत तापमानात लक्षणीय वाढ झालेली असल्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाया जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी असून शिल्लक असलेल्या जलसाठ्याचा वापर अत्यंत काळजी पूर्वक करणे गरजेचे आहे. तसेच गुरांसाठी व पशु पक्ष्यांसाठी देखील पान्न्याची सौय प्रत्येकाने करावी असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.