एरंडोलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0

एरंडोल – एरंडोल शहरात स्त्री शिक्षकनाच्या प्रमुख सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शहर तथा तालुक्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. धरणगाव रस्त्यावर असलेल्या महात्मा फुले मंडळ संचालित सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडीयम या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या माता व पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व या स्पर्धांमध्ये बहुसंख्य माता व पालकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला व पारितोषिके मिळवली. तसेच याप्रसंगी शाळेतील चिमुरड्यानी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला व पारितोषिके मिळविली.यावेळी काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणे देखील केली.याच शाळेतील चिमुरड्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पोषक परिधान करून हुभेहूब देखावा सादर केला. यावेळी संस्थेच्या संचालिका मंगला महाजन, सारिका चौधरी, निता तायडे, शाळेचे प्राचार्य विजय पाटील, दीपक माळी, नेहा काकडे, सिमा पाटील हजर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांनी परिश्रम घेतले.