एरंडोल । धनगर समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश करून समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार सी.बी.देवराज व पोलीस निरीक्षक देविदास पवार याना समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी डॉ.प्रवीण चंद्रभान वाघ, चंद्रकांत पारखे, कृष्णा धनगर, आनंदा धनगर, वामन धनगर, नवल धनगर, राजेंद्र धनगर, गोविंदा धनगर, कैलास धनगर, युवराज धनगर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक देविदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.