एरंडोल । शेतकरी कधी दुष्काळाने होरपळला जातो तर कधी महागाईने. मागील काही वर्षापासून शेतीमालाला योग्य भाव नसल्याने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात हाणी सहन करावी लागली आहे. सततच्या नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. असे असतांनाही तो शेतात राबराब राबुन धान्य पिकवतो. सोन्यासारख्या पिकविणार्या धन्याला योग्य भाव मिळावा अशी आशा त्याला असते परंतु त्या धान्याला मातीमोल भाव मिळते. अनेक वेळा त्यांची फसवणूक देखील होत. याचाच एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील कृउउपबाजार समिती येत आहे.
एकाच घरातील दोन व्यक्तींना लावले वेगवेगळे दर
एरंडोल येथील शेतकरी चंद्रकांत पंडित चौधरी यांचे भाऊ दिलीप परभत चौधरी हे एरंडोल येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत 45 क्विंटल गहू विक्रीसाठी घेऊन गेले. त्यांच्याकडून प्रती क्विंटल एक हजार 625 रुपये या दराने व्यापार्यांनी गहू खरेदी केला. त्यानंतर चंद्रकांत पंडित चौधरी हे सुद्धा बाजार समितीत 30 क्विंटल गहू घेऊन गेले असता व्यापार्यांनी प्रति क्विंटल एक हजार 350 रुपये दराने खरेदी केली. एकाच वेळेस दोन व्यक्तियंकडून दोन दरात खरेदी केली जात आहे. फसवणुकीचा प्रकार शेतकर्यांच्या लक्षात आल्याने शेतकर्यांनी एकत्र येत शनिवारी 25 रोजी एरंडोल तहसीलदार सुनिता जर्हाट यांना निवेदन देण्यात आले.