एरंडोल । येथे गटसाधन केंद्रात तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन मंगळवार 1 ऑगस्त करण्यात आले होते. ’स्वच्छ भारत, विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका, शक्यता अव्हाने‘ या विषयावर तालुक्यातील सहा शाळेतील आठवी ते दहावीच्या 12 विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.
विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील काबरे विद्यालयातील निशिता पेंढारकर या विद्यार्थीनीने प्रथम तर जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा सौरभ देसले याने दुसरा क्रमांक पटकाविला. दोघा विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून समिता पाटील व एच.डी.पाटील यांनी काम बघितले. तर मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक अमोल वाणी, शिक्षक संदीप चव्हाण, नेहा शर्मा यांनी परिश्रम घेतले.