एरंडोल । एरंडोल तालुक्यात सद्या दुष्काळ परिस्थिती असून पाऊस सुद्धा जेमतेम झालेला आहे त्यामुळे खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला असून त्यातील कापूस, ज्वारी, मका, उडीद, मुग आदी पिके शेतकर्यांच्या हातातून गेली असल्याने शासनातर्फे एरंडोल तालुका दुष्काळ जाहिर करावा, अश्या मागणीचे निवेदन माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याउपस्थिती तहसीलदार यांनी देण्यात आले. यावेळी शिवसेनेतर्फे धरणगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल दीड तास वाहतूकीचा खोळंबा उडाला होता.
निवेदना म्हटल्याप्रमाणे, एरंडोल तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाच्या पिकांची अतिशय केवीलवाणी स्थिती झालेली असून कापूस, ज्वारी, मका, उडीद, मूग यांच्यासारख्या इतर हातातील पिके निघून गेली आहे. त्यामुळे या पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्याचप्रमाणे गावांगावांमध्ये आत्तापासून गुरा-ढोरांना चार्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असून दुष्काळसदृश्य परीस्थिती असल्यामुळे तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत काही मागण्याही करण्यात आले.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
माजी आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शहरप्रमुख प्रसाद दंडवते, सुनिल मानुधने, युवासेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील, अतुल महाजन, हिम्मत खैरनार, गबाजी पाटील, छोटू मराठे, महानंदा पाटील, सरिता मंत्री, चिंतामन पाटील, चुनिलाल देशमुख, गट नेतरे दर्शना ठाकूर, सुधाकर पाटील, प्रमोद महाजन, नगरसेविका आरती महाजन, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, उपतालुकाप्रमुख संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.