एरंडोल । तालुक्यातील होमिओपॅथी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक शांततेत पार पडली. बैठकीत होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्यूअल हँनिमन यांची जयंती साजरी करण्यात आली. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रकाश भंगाळे, जिल्हा सचिव डॉ. सुभाष देशमुख यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. बैठकीत तालुका संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. रमाकांत पाटील यांनी जाहीर केले. तर डॉ.डी.आर.पाटील यांची उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.
कार्यकारिणीतील सदस्य याप्रमाणे
संघटनेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे सचिवपदी डॉ. सचिन महाले, सहसचीव डॉ. अमोल शिंपी, खजिनदार डॉ.प्रशांत दुसे, सहखजिनदार डॉ. इरशात सय्यद, कार्याध्यक्ष डॉ. नितीन राठी, प्रसिद्धी प्रमुख डॉ. महेंद्र पाटील, तालुका संघटक डॉ.अजय सोनी. यावेळी डॉ.प्रकाश भंगाळे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. मंडोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रमाकांत पाटील यांनी स्वागत केले. बैठकीस डॉ. हेमंत चौधरी, डॉ.बी एस. पाटील, डॉ.सचिन बाविस्कर, डॉ. सुभाष पाटील, डॉ. एल.एम महाजन यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे डॉ नलीन महाजन यांनी आभार मानले.