एरंडोल तालुक्याचा बारावीचा निकाल 90.15 टक्के

0

एरंडोल । एरंडोल तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 90.15 टक्के लागला असून दादासाहेब पाटील महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जान्हवी राजेंद्र पाटील 85.69 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तर महाविद्यालयाचाच विद्यार्थी केतन दिलीप सावंत हा 83.23 गुण मिळवून द्वितीय तर कांचन भाईदास पाटील व साहिल अशोक महाजन 82.42 टक्के गुण मिळवून तृतीय आले. बारावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून 1483 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1337 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दादासाहेब पाटील महाविद्यालायाचा निकाल टक्के 90.59 टक्के लागला असून यात विज्ञान शाखेचा निकाल 98.49 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 96.09 तर कला शाखेचा निकाल 75.53 टक्के याप्रमाणे लागला आहे. किमान कौशल्य विभागाचा निकाल शंभर टक्के लागला. रामनाथ तिलोकचंद विद्यालयाचा निकाल 85.71 टक्के लागला. विद्यालयातून काजळ शेखर सपकाळे 67.43 टक्के गुण मिळवून प्रथम तर भूषण अर्जुन मराठे 66.46 टक्के गुण मिळवून द्वितीय आला. विद्यालयातील 41 पैकी तिस विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अंग्लो उर्दू हायस्कूलचे 46 पैकी 39, जिजामाता विद्यालयाचे 30 पैकी 26, रवंजे येथील गौरीशंकर उच्च माध्यमिक विद्यालयातील 58 पैकी 49, कासोदा येथील साधना माध्यमिक विद्यालयातील 72 पैकी 60, शहजादी उर्दू ज्युनिअर कॉलेजचे 43 पैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.