एरंडोल । अंजनी प्रकल्पातून पाण्याची चोरी करीत असलेल्या आठ शेतकर्यांचे कृषी पंप जप्त करण्यात आले. नगरपालिका व गिरणा पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाने पाणी चोरणार्याविरुद्ध कारवाई केली. पाणी चोरणार्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. अंजनी प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची माहिती नगर पालिका व पाटबंधारे विभागाला मिळाली होती. एरंडोल पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता एम.आर.अत्तरदे यांचे मार्गदर्शनाखाली जाकीर सैयद, डी.बी.सोनवणे, आर.के.पाटील, दिपक गोसावी, संजय चौधरी यांचेसह कर्माचार्यांनी अंजनी प्रकल्पस्थळी गुरुवारी सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रकल्पातून धारागीर येथील पाच तर खडकेसिम येथील तिन असे आठ शेतकरी प्रकल्पातून शेतीसाठी अनधिकृतपणे पाण्याची चोरी करतांना आढळुन आले.पथकाच्या सदस्यांनी पाणी चोरी करणारे आठही कृषी पंप जप्त केले.
पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
प्रकल्पातून कृषीसाठी पाणी वापरणार्यां विरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असुन नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन नगरपालिका व पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच प्रकल्पातून कृषीसाठी पाण्याची चोरी होत असेल तर त्याची माहिती पालिका प्रशासन व पाटबंधारे विभागास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानामुळे जलसाठ्यात घट
यापुढे देखील प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याची चोरी कारणर्यांविरुध्द मोहीम राबविणार असल्याचे पथकातील कर्माचार्यांनी सांगितले. नगरपालिका व पाठबंधारे खात्याच्या कर्मचार्यांनी पाणी चोरांणार्यांविरुद्ध सुरु केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अंजनी प्रकल्पात केवळ 1.40 टक्के जिवंत जलसाठा असुन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढत्या तापमानामुळे लक्षणीय घट होत आहे. प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा, फरकांडे, सोनाबर्डी, जळू, नांदखुर्द, यासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच आगामी काळात ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास द्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन देखील प्रकल्पातील जलसाठ्यावरच अवलंबून आहे. यापूर्वी जिल्हाधिकार्यांनी गिरणा पाटबंधारे विभागास पत्र पाठवुन प्रकल्पातील जलसाठ्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याचे कळविले आहे.