एरंडोल तालुक्यातील विद्यार्थ्यानाही मिळणार मोफत पास

0

राष्ट्रवादी व शिवसेनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न
एरंडोल – तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही आता मोफत पास मिळणार असल्याची माहिती एरंडोल तालुका शिवसेनेने व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कळविण्यात आले आहे. एरंडोल तालुका हा दुष्काळ ग्रस्त जाहीर झाला नव्हता, परंतु एरंडोल तालुक्यातील दोन मंडळांना शासनाने काही दिवसांनी दुष्काळ ग्रस्त जाहीर केले होते. परंतु त्या भागातील विद्यार्थ्यांना मात्र शासनाच्या नियमानुसार मोफत पास मिळत नव्हती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लवकरच उशिरा दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही मोफत पासची सवलत मिळणार असल्याचे सांगितले होते व ते पुर्ण केले. याबाबत माजी आमदार चिमणराव पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील व संपुर्ण एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यातील विविध पदाधिकारी व जि.प.चे सदस्य रोहन पाटील यांनी आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथील धरणगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करून आगर प्रमुखांना विद्यार्थ्यांना मोफत पास मिळावी म्हणुन निवेदन दिले होते. त्यामुळे आज विद्यार्थ्यांना मिळालेल्या मोफत पास ह्या आमच्याच आंदोलनाने मिळाली असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्‍यांनी सांगीतले आहे.