एरंडोल : तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या लोकांची संख्या ३२७५ इतकी असून लॉक डाऊन च्या काळातही या संख्येत वाढ होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना १४ जणाना होम क्वारंनटाइन चा सल्ला देण्यात आला आहे. मात्र परदेशातून आलेल्या व्यक्तींची संख्या २० वर स्थिरावलेली आहे.
एरंडोल तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही ही विशेष समाधानाची बाब मानली जाते. एरंडोल शहरात व ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने नागरिक सोशल डिस्टन्सीग चे पालन करीत आहेत. मात्र अजूनही काही लोकांना कोरोना विषाणू बाबत गांभीर्य नाही. त्यांच्या बेजबाबदार वर्तनाचा फटका संपूर्ण गावाला किंवा शहराला बसू शकतो. या पार्श्वभूमीवर अशा बेफिकीर नागरिकांना आता कायद्याचा बडगा दाखवण्यात येणार आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे एरंडोल पोलीस स्टेशनचे पी.आय. स्वप्नील उनवणे यांनी स्पष्ट केले आहे. भाजीविक्रेत्या , अत्यावश्यक सेवा, औषधी दुकाने त्याठिकाणी जर सोशल डिस्टन्सीग
पाळली नाही तर अशा लोकांना लवकरच पोलिसांच्या खाक्याला सामोरे जावे लागणार आहे.