कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
एरंडोल: येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या असून शहरात विविध जंतुनाशके व सॅनिटयजर्स द्वारे फवारणी करून शहर सॅनीटइज करण्यात आल्याचा दावा न.पा. प्रशासनाने केला आहे.
शहरामध्ये २१ फेब्रुवारी रोजी गटारीवर मलेरीयन ऑईलची हात पंपाद्वारे फवारणी करण्यात आली. तसेच २६ मार्च रोजी सोडियम हायपोक्लोराइटची हातपंपाद्वारे फवारणी करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी व मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी तत्परता दाखवून तात्काळ फवारणी यंत्र खरेदी करून ही फवारणी यंत्र ट्रॅक्टरवर कार्यान्वित केले. फवारणी यंत्राद्वारे पुन्हा २७ मार्च रोजी सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात आली. अग्निशमन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख रस्ते मारवाडी गल्ली परिसर, पंचायत समिती व न्यायालय परिसर, आठवडे बाजार परिसर, दरवाजा परिसर, चौक ते बाखरूम बाबा परिसर, आदी गर्दी होणार्या भागांमध्ये सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात आली. एरंडोल शहरवासीयांनी लॉकडाऊन कालावधीत आपापल्या घरीच बसून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.