एरंडोल । येथे नागरापालीकातर्फे केवडीपुरा परिसरात तीस शौचालय बांधकामाचे व अंजनी नदी पात्रातील साफसफाई कामाचे भूमिपूजन भाजपचे संघटन मंत्री किशोर काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याकामांमुळे भविष्यात केवडीपुरा परिसरात राहणार्या शौचविधीचा प्रश्न मार्गी लागणार तर अंजनी नदी पात्र स्वच्छ झाल्याने दुर्गंधीला आळा बसणार आहे.
यावेळी कार्याकामाच्या प्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जाहिरोदिन शेख, नगरसेवक नितीन महाजन, योगेश देवरे, सुरेश पाटील, अभिजित पाटील, नितीन चौधरी, नगरसेविका सरलाबाई पाटील, दर्शना ठाकुर, सुरेखा चौधरी, वर्षा शिंदे, आरती महाजन डॉ. नरेंद्र ठाकुर यांचेसह नरेंद्र पाटील, अतुल महाजन, राजेंद्र शिंदे, अशोक चौधरी, अशपाक बागवान, चिंतामण पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज पन्हाळे, आनंद दाभडे यांनी परिश्रम घेतले.