कासोदा। महाराष्ट्र शासनच्या तक्रार निवारण कक्ष स्थापन अशासकीय सदस्यपदी पुष्पाताई अतुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपदी स्नेहा कुडचे, पवार, बीडीओ पं.स.एरंडोल, निशाद फिरोज अहमद शेख, तालुका वैद्यकिय अधिकारी एरंडोल सदस्य, कल्पना कोकंदे विस्तार अधिकारी, आरोग्य, सदस्य कनिष्ठ अभियंता वैशाली जडे, पर्यवेक्षिका लता सुभाष पाटील, अशासकीय सदस्य पुष्पा पाटील, कक्ष अधिकारी विजय चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक अजित कुरकुरे, चित्रा जोशी, सचिव वरिल समिती नेमण्यात आली. यात विशेष म्हणजे सर्व शासकीय अधिकार्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून पुष्पाताई यांना संधी मिळाल्याने कासोदा आडगाव सह परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर समितीने पुढील अटीशर्तीनुसार कार्यवाही याप्रमाणे
सदर समितीने पं.स.एरंडोल अंतर्गत कार्यरत असले महिला कर्मचार्यांच्या तक्रारींची दखल घेवून त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाय योजून कार्यवाही करावी. सदरच्या समितीने तक्रार निवारण्याच्या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अध्यक्षा तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प.जळगाव कडेस सादर करावा, दरमहा सभा विकास अधिकारी पं.स.एरंडोल यांच्या दालनात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न चुकता घ्यावी. दरमहा होणार्या सभेचे इतिवृत्त अध्यक्ष तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. जि.प. जळगावकडे सादर करावे. सदर कामासाठी कोणता शासकीय भत्ता अगर इतर अनुषांगिक खर्च अनुज्ञेय असणार नाही., तक्रार निवारण संदर्भात नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी सदर समिती पुढील आदेश पारित करण्यात आली आहे.