एरंडोल येथे गुढीपाडवानिमित्त भगव्या चौकाचे सुशोभीकरण

0

एरंडोल । गुढीपाडव्यानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटना व भगवा चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्यानिमित्त शहरातील ऐतिहासिक महत्व असणार्‍या भगव्या चौकाचे आकर्षकपणे सुशोभीकरण करण्यात आले होते. गुढीपाडव्यानिमित्त भगवा चौक मित्र मंडळातर्फे गाव गुढी उभारण्यात आली होती. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्याहस्ते गुढीचे पुजन करण्यात आले. तसेच पुज्य गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.

विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी
यावेळी नगरसेवक कृणाल महाजन, बबलु,चौधरी, माजी नगरसेवक जगदीश ठाकुर, डॉ.एन.डी.पाटील, सुरेश खुरे, राजेंद्र काबरे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, गुड्डू ठाकुर, अशोक चव्हाण, ऋषिकेश शिंपी, अमोल भावसार, चेतन कापुरे, अमोल देवरे, सचिन चव्हाण, मयूर बिर्ला, मुकेश पाटील, अरुण महाजन, आनंद भावसार, शुभम मोराणकर, प्रणव मोराणकर, निलेश बाहेती, सागर शिंपी, बजरंग वाणी, तुषार शिंपी, विकी ठाकुर, तुषार मोरे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान शहरात गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घराघरात गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. विविध सार्वजनिक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.