एरंडोल येथे चर्मकार महासंघातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

एरंडोल: येथे चर्मकार महासंघातर्फे चर्मकार समाजातील विधवा , मोल -मजुरी व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप येथील चर्मकार समाज मंदिरात करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता ठाकरे व त्यांचे पती दीपक ठाकरे यांनी समाजसेवेच्या भावनेतून, समाजातल्या वंचित, निराधार व समाज आपुलकी म्हणून या भावनेतून केले होते. यात सुमारे ५० ते ६० महिलांना खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू सोशल डिस्टन्सींग राखून देण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, सुनिता बाविस्कर. , प्रा. महेश वसईकर ,नागनाथ साळुंके, मधुकर आहिरे, अरुण मोरे ,साखर लाल वाघ, के.के. मोरे ,तालुका अध्यक्ष वासुदेव वारे, कविता वारे, रवींद्र मोरे, लक्ष्मण वानखेडे रवींद्र बाविस्कर धीरज विसावे आदी समाज बांधव उपस्थित होते.