पंचायत समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
एरंडोल – येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना पंचायत समितीतर्फे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरावरून तालुक्यातील १३ विद्यार्थ्यांना साहित्य वाटण्यात आले. यात तिन ट्रायसिकल,तिन सी.पी.चेअर, पाच श्रवण यंत्रे, दोन एम.आर.कीट आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पं.स.चे सभापती रजनी सोनवणे, उपसभापती अनिल महाजन, पं.स.सदस्य विवेक पाटील, निर्मला मालचे,शांताबाई महाजन, रेशमाबी पठाण, माजी सभापती मोहन सोनवणे यांच्या उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या सदर उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी कार्यक्रमात जि.प.शाळा खेडी येथील गौरव दिनकर सोनवणे यास ट्राय सिकल देण्यात आली. त्याचप्रमाणे हनुमंत खेडे येथील दिव्यांग बालक तुषार विनोद पाटील यास सी.पी.चेअर देण्यात आली. गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, सहायक गटविकास अधिकारी गणेश सुरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख आदिंनी अपंग समावेशित योजने बाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी यांनी तर आभार व्ही.एच.पाटील यांनी मानले. सुत्रसंचलन मंदार वडगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गुरुदास शिंपी, भीमराव भालेराव, सुनिता डहाके, विजय बडगुजर, दत्तात्रय पवार, युवराज पाटील यांनी परिश्रम केले.