एरंडोल येथे नगरपालिकेच्या सहा सभापतीची बिनविरोध निवड

0

एरंडोल । येथे नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतीची निवड करण्यासाठी शनिवार 4 फेब्रुवार रोजी नागरापालिका कार्यालयात पिठाशीन अधिकारी तहसिल सुनिता जर्‍हाड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सर्व नागरसेवाकांची बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जाहिरुद्दिन शेख, मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांची उपस्थिती होती. यावेळी सहा समित्यांची सभापतीची सर्वांमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेले सभापती पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा सभापतीपदी हर्षाली प्रमोद महाजन, नियोजन समिती सभापतीपदी कल्पना दशरथ महाजन, महिला बालकल्याण सभापतीपदी प्रतिभा चिंतामण पाटील, आरोग्य समिती सभापदी जाहिरोद्दिन शेख, बांधकाम समिती सभापतीपदी योगेश महाजन तर स्थायी समिती सभापतीपदी नाराध्यक्ष रमेश परदेशी यांची निवड करण्यात आली. अवघ्या 15 मिनिटात खेळीमेळीच्या वातावरणात पिठाशीन अधिकारी यांनी सदर निवड जाहीर केली. आभार कार्यालीन अधीक्षक हितेश जोगी यांनी मानले.