एरंडोल । शहरात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पदाधिकारी व नगरपालिकेच्या अधिकार्यांमध्ये मतभेद होत असुन. नागरिकांच्या मते शहरातील विकास हा प्रशासन व पदाधिकार्यांच्या भांडणाने खुंटत चालला असल्याचे चित्र आहे. त्यांचा बहुतांश वेळ हा आपसी भांडण सोडविण्यातच जात असुन काही वेळेस प्रकरण हे पोलीस स्टेशन पर्यंत जाते व जवळपास पाच ते सहा तास पोलीस स्टेशनला पदाधिकारी व न.पा.अधिकारी व कर्मचारी दिसून येतात. असाच प्रकार येथे बुधवारी घडला. यादरम्यान आज दि.26 रोजी दुपारी पालिकेचे अधिकारी व एका राजकीय नेत्यामध्ये मध्ये मोठा वाद झाला असल्याची चर्चा शहरात वार्यासारखी पसरली. हे प्रकरण एरंडोल पोलीस स्टेशनला गेले. त्या ठिकाणी संबंधीत नेत्यासह त्यांचे समर्थक तसेच न.पा. अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु काही तासातच या प्रकरणावर पडदा पडला व प्रकरण शांत झाले. परंतु जनतेच्या मते निव्वळ अशा वादांमुळे विकास खुंटला असुन याकडे वरिष्ठांनी हस्तक्षेप घालून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.