एरंडोल। शहरातील बुधवार दरवाजा परिसरातील जय श्रीराम प्रतिष्ठान व जळगाव येथील कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयाताई पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती जयाताई पाटील यांनी जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामुळे गोरगरीब रुग्णांना लाभ झाल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून निगा राखावी असे आवाहन केले. शिबिरात 88 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच बारा रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नावे नोंदविण्यात आली.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी गोपाल शामू पाटील, शांताराम धुडकू महाजन, दिलीप पाटील, जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ब्रिजेश कुमार, डॉ. भारत साळवे, पिंटू आरखे यांनी रुग्णांची तपासणी केली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहित दिली. शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, खजिनदार सुमेघ महाजन, ऋषिकेश महाजन, सदानंद पाटील, अमित पाटील, अनंत महाजन, पवन महाजन, निखील पाटील, ओम पाटील यांचेसह संस्थेच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.