एरंडोल येथे भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा बैठक

0

एरंडोल । भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे ओबीसी मार्चाची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांचे अध्यक्षतेखाली व प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. सदर बैठक जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील जामनेर, विवेक चौधरी चाळीसगाव, माजी नगराध्यक्ष रवी महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दगडू माळी कोळगाव, नाना पाटील, माधव चौधरी, शशीकांत जावळे, नारायण रणधीर, अ‍ॅड. प्रकाश पाटील, किशोर चौधरी, रमेश पालवे, सुरेश कुटे, अजश सोनार, युवराज चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सचिन विसपूते यांनी केले.

बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा
जिल्हा कार्यकारिणीची बैठक पहिलीच असल्याने नवनिर्वाचीत कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी व प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांनी केले. अजय भोळ यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले. ओबीसीच्या अनेक प्रश्‍नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी विद्यापीठात स्वतंत्र वसतीगृहाची मागणी करण्यात यावी. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे, जेष्ट नागरीकांसाठी धार्मीक तिर्थ यात्रा, तसेच ओबिसी समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करावा असे अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.