एरंडोल येथे मद्य विक्रीची दुकाने सील

0

एरंडोल : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे रविवारी ५ एप्रिल २० रोजी मद्य विक्री च्या दुकानांना सील करण्यात आले. एरंडोल शहर व परिसरातील एकूण १५ दारू विक्रीच्या दुकानांवर सदर कारवाई करण्यात आली त्यात परमिट रूम १० बिअर शॉपी २ देशी दारू दुकाने ३ याप्रमाणे समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात कोणत्याही प्रकारची मद्य विक्री होऊ नये व संचारबंदी काळात दारूमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्पादन शुल्क यंत्रणेचे दुय्यम निरीक्षक पाचोरा व्ही. एम. माळी, प्रकाश तायडे, रवींद्र जंजाळे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ११ते१२ वाजेदरम्यान दारूची दुकाने सील केली, या कारवाईमुळे तुर्तास १५ एप्रिल पर्यंत मद्य विक्रीची सदर दुकाने बंद राहतील.