एरंडोल । महाराष्ट्र फुटबॉल मिशन वर्ल्ड क्लब स्पर्धा भारतात होत आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडासंस्कृती रुजण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार 15 सप्टेबर 2017 रोजी तालुक्यातील विविध शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एरंडोल येथील दादासाहेब डी.शं.पाटील महाविद्यालय येथे मिशन मिलियन फुटबॉल उपक्रमाचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, पं.स.च्या सभापती रजनीताई सोनवणे, माजी सभापती मोहन सोनवणे, पं.स.चे उपसभापती विवेक पाटील, सदस्य अनिलभाऊ महाजन, दादादासाहेब दि.शं.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.पाटील, गटशिक्षणधिकारी एन.एफ.चौधरी, शिक्षणविस्तारधिकारी विश्वास पाटील, तालुका क्रीडा समन्वयक प्रा.मनोज पाटील उपस्थित होते. तर रा.ती.काबरे विद्यालयात नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्याहस्ते याच उपाक्रमांतर्गत फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख बोरसे, शालेय समितीचे चेअरमन गोविंद लढे, मुख्याध्यापिका रोहिणी मानुधाने, राजमल नवाल, पर्यवेक्षक अजय मालू व सर्व शिक्षक उपस्थित होते.