शहराचे नाव नावारूपाला आणण्यासाठी एरंडोल नगरपालिकेचे सहकार्य
एरंडोल । एरंडोल शहर हे 34 हजार लोकवस्तीचे एक छोटे शहर असुन शहराचे क्षेत्रफळ 48 केअर्स किलोमीटर एवढे आहे. एरंडोल शहराला पुरातन कालीन वसा लाभलेला आहे. शहरात पांडवानी रहिवास केल्याच्या खुणा एरंडोलला लाभल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज यांचे स्वप्न पुढे नेत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला संकल्प स्वच्छ भारत अभियानात 100 टक्के उतरून एरंडोल शहर हागणदारीमुक्त करून शहरात अद्यावत सार्वजनिक सौचालाय तयार करून शहराचे नाव नावारूपाला आणण्याचे कार्य एरंडोल नगरपालिकेने केले आहे.
एरंडोल शहर हागणदारीमुक्त करण्याचा वसा माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी घेतला. त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शहरात सहा सार्वजनिक शौचालाय बधून शहर हागणदारीमुक्त करण्यास सुरवात केली. जयश्री पाटील ह्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असल्याने स्वच्छता व आरोग्याची पुरेपूर जाण असल्याने आपल्या वार्ड क्र. 5 मध्ये अद्यावत शौचालाय उभारण्याचे मत त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्याकडे व्यक्त केले. सौ. पाटील यांची संकल्पना चागली असल्याने नगरध्यक्षांनी देखील जातीने लक्ष घालून स्वप्नातील ऐतिहासीक शौचालय पूर्ण करण्यास खंभीरपणे उभे राहून ‘सत्यमेव जयते‘ यांच्या सहकार्याने जिवंतरुपात यशस्वीपणे उतरविले.
शौचालयातील विनामुल्य सुविधा
महिलांसाठी 15 सीट्स, पुरुषासाठी 15 सीट्स, तसेच गुडघेदुखी त्रस्त असलेल्यांसाठी कॅमोड, वातानुकुलीत यंत्र, मेडिकल बॉक्स, औषधी, वाचण्यास वर्तमान पत्र, भिंतीवर बोध वाक्य, सुशोभित बाहेर कारंजे, छोटी बाग, पर्यावरण संदेश, झाडे लागवड, वस्तूच्या वरील मजल्यावर रोजच्या सफाईसाठी स्वच्छता सेवकासाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सहकार्य, परिश्रम व मार्गदर्शन
भाजपा संघटन मंत्री किशोर काळकर, उपनगराध्यक्ष शे.जाहिरोद्दिन व एरंडोल नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख, मुख्याधिकारी सचिन माने, बांधकाम अभियंता पन्हाळे सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे पालिका पदाधिकारी
एका ऐतिहासिक शौचालय रुपी वस्तूला नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपाध्यक्ष जाहिरोद्दिन शेख यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका आणि पालिका प्रशासन या सर्वांचे मोलाचे परिश्रम यात सामील आहे. माझे पती माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे मला वेळोवेळी मोलाचे सहकार्य असते. या ऐतिहासिक वस्तूला (शौचालयाला) आपण सर्व नगरवासी सन्मानपूर्वक वापर करून आपण सर्व मिळून आदर्श निर्माण करू या, ही एक आपल्याच घरातील वस्तू समजून आपल्या राष्ट्राची दिशादर्शक वस्तू म्हणून वापरू या, कारण भविष्यात हे शौचालय रोलमोडेल आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.
– जयश्री पाटील, नगरसेविका, वार्ड क्र.5