एरंडोल येथे सुराज्य अभियान रथयात्रेचे स्वागत

0

एरंडोल – येथे महाराष्ट्र शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने विविध योजनांची माहिती सर्व सामान्य जनता व महाराष्ट्रातील जनतेला कळावी यासाठी शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या सुराज्य अभियान रथयात्रेचे एरंडोल येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरणगाव चौफुलीवर स्वागत केले. दरम्यान सदर रथयात्रा ही शहरातील म्हसावद नाका,पांडव वाडा परिसर व धरणगाव चौफुलीवर 12 एलईडी परद्यावर महाराष्ट्र शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्त केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेसमोर दाखवण्यात आली.तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाने 9904104104 या टोलफ्री क्रमांकावर सर्वांसाठी विविध योजनांची माहिती मिळणार असल्याचीही माहिती एका माहिती पत्रकाद्वारे कळवण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, निलेश परदेशी, प्रशांत महाजन, भुषण जगताप, अमोल जाधव, संजय साळी, सचिन पानपाटील, हृशिकेश पाटील, सचिन विसपुते, मधुकर देशमुख, अमर राजपुत, किशोर पाटील, हितेश महाजन, किशोर महाजन आदी हजर होते.