एरंडोल । स्वामी विवेकानंद यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त एरंडोल येथे स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा एरंडोल व गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने रा.ती. काबरे विद्यालयावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबाराचे उदघाटन एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमही शहरात घेण्यात आले. युवकांची रा.ति.काबरे विद्यालयापासून सायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवर काढण्यात आली. युवकासाठी स्वामी विवेकानंद या विषयावर प्रा.गौरव महाले यांनी व्याख्यानातून मार्गदशन केले व दि.13 रोजी भव्य शोभा यात्रा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 160 दात्यांनी रक्तदान केले.
शिबिरात रा. ती. काबरे विद्यालयाचे अध्यक्ष मनोज बिर्ला , राहुल तिवारी, संजय काबरा, डॉ. इब्राहीम बोहरी, नमिता सोनी, सोनाली तिवारी आदिंनी रक्तदान केले तर गोळवलकर रक्त पतपेढीचे डॉ. गणेश पाटील व त्यांचे सहकारी तसेच डॉ. नरेंद्र पाटील,नगरसेविका जयश्री पाटील, आर.डी. पाटील, जी. आर. पाटील, नरेश डागा ,आर.एम. कुलकर्णी ,स्वप्नील महाजन ,मंगेश पाटील ,राजु पाटील ,दीपक पाटील ,सदाशिव पाटील ,जितेंद्र पाटील संजय सूर्यवंशी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले