स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांची माहिती
जळगाव- शहरात लावण्यात आलेल्या आणि विस्तारीत भागात लावण्यात येणार्या एलईडी पथदिव्यांबाबत स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी मनपा विद्युत विभागाचा आढावा घेतला.दरम्यान,एजन्सीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण आणि मॉडिफिकेशन करुन डीपीआर तयार करण्याची सूचना देवून आठ दिवसात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी दिली.
जळगाव शहरात केंद्र शासनाकडून नियुक्त केलेल्या इइइएसएल या एजन्सीकडून एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.मात्र काम योग्यरितीने होत नसल्याने नगरसेवकांनी तक्रारी केल्याने एजन्सीचे काम थांबविण्यात आले. तसेच नोटीस बजावल्यानंतर एजन्सीने पुन्हा काम सुरु करण्याचे मान्य केले.दरम्यान,सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी मनपा विद्युत विभागाचा आढावा घेतला.
एजन्सीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण
एजन्सीने शहरात सर्व्हेक्षण व मॉडिफिकेशन करुन त्यानुसार विस्तारीत डिपीआर तयार करावा. त्यानतंर पथदिवे बसविण्यास सुरुवात करावी अशी सूचना स्थायी सभापती हाडा यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आठ दिवसात काम करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानक ते टॉवर चौक यादरम्यानचे पथदिवे विस्तारीत डीपीआरनुसार बसविण्यात येणार असल्याची माहिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी दिली.