जिल्हा पोलीस दलात बदल्या ; 484 बदलीपात्र कर्मचार्यांपैकी 245 जणांना मुदतवाढ
जळगाव : पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात गेल्या आठवड्यात पोलीस बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रशासकीय,विनंती व स्वग्राम अशा तीन प्रकारात बदल्यांसाठी मुलाखती झाल्या. प्रत्येक कर्मचाजयाकडून पसंतीचे तीन क्रम अर्जात भरुन घेण्यात आले होते. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली असून यात एकूण 484 कर्मचारी बदलीपात्र होते त्यापैकी 245 जणांना मुदतवाढ व विनंती मान्य करण्यात आली आहे. सर्वात महत्वपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेतून 11 जणांची बदली झाली असून याठिकाणी 19 नव्या चेहर्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी मध्यरात्री बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. सध्या ज्या पोलीस ठाण्यात कर्मचारी कार्यरत असेल त्याला लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात बदली दिलेली आहे. त्याशिवाय निवृत्तीला काही दिवस बाकी असलेले किंवा मुलांचे शिक्षण, आजारपण याचा विचार करुन प्रत्येकाची विनंती मान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बदल्यांमुळे कर्मचाजयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विनंती मान्य, मुदतवाढ मिळाली
एलसीबी, शनी पेठ, मेहुणबारे व भुसावळ तालुका या चार ठिकाणीच बदलीसाठी जास्त अर्ज आले होते. बदलीपात्र 75 सहायक फौजदारांच्या मुलाखती झाल्या त्यात 50 जणांना , 184 हवालदारांपैकी 78 जण, 86 पोलीस नाईकांमध्ये 26 जण, 114 पोलीस कॉन्स्टेबलपैकी 50 जण तसेच 34 महिला पोलिसांपैकी 20 तर मोटार वाहन विभागातही 31 पैकी 21 जण अशा प्रकारे 484 बदलीपात्र कर्मचार्यांपैकी 245 जणांना मुदतवाढ व विनंती मान्य करण्यात आली आहे.