जळगाव। पारोळा ते अमळनेर रोडवर एचपी पंपाच्यापुढे वंजारी शिवारात गुरांचे गोठ्याजवळ सार्वजनिक जागी अवैध दारूची विक्री करतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एकास अटक करून त्याच्याकडून एक लाख अकराहजार चारशे बारा रूपयंची अवैध दारू जप्त केला करून त्यास अटक केली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाला पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा ते अमळनेर शिवरात किशोर तुकाराम चौधरी याच्याकडे अवैध दारूसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर स्थागुशाचे पथक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, सफौ मनोहर देशमुख, पोहेकॉ. दिलीप येवले, अशोक चौधरी, सतिश हाळणोर, नापोकॉ रमेश चौधरी, रविंद्र गायकवाड, पोकॉ सुशिल पाटील, मिलींद सोनवणे, प्रविण हिवराळे यांच्या पथकाने छापा टाकून अशोेक तुकाराम चौधरी (रा. वंजारी शिवार) यास अटक केली. या छाप्यात अशोक चौधरीकडून एक लाख अकराहजार चारशे बारा रूपये किंमतीच्या देशी, विदेशी दारू व बियर साठ्या हस्तगत करण्यात आला. किशोर विरूद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.