पुणे । लेवा चेंबर ऑफ कॉमर्स (एलसीसीआयए) तर्फे हेल्थकेअर कॉन्फरन्स 2017चे पुण्यातील हॉटेल जेडब्ल्यू मेरिएट येथे रविवारी (दि.10) सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. या कॉन्फरन्समध्ये विविध मुद्द्यांवर चर्चेसह विविध पुरस्कारांचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती एलसीसीआयएचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी दिली.
यांची असेल प्रमुख उपस्थिती…
कॉन्फरन्सचे प्लॅटिनम स्पॉन्सर जीआरडी एन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. हे आहेत. या कॉन्फरन्सला एलसीसीआयएचे कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील, सहअध्यक्ष डॉ. सुरेंद्र भिरूड, सचिव डॉ. राहुल चौधरी, सहसचिव डॉ. विवेक नेमाडे, कोषाध्यक्ष डॉ. भूषण जावळे, सहकोषाध्यक्ष डॉ. स्वप्नील भोळे, आयोजन प्रमुख डॉ. रत्नप्रभा चौधरी, हेल्थकेअर समन्वयक डॉ. पवन भोळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
हे आहेत कॉन्फरन्समधील प्रमुख कार्यक्रम
सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजेदरम्यान अध्यक्ष रवींद्र चौधरी हे लेवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्याची माहिती देणार असून, त्यानंतर दीपप्रज्वलनाने या कॉन्फरन्सला सुरुवात होईल. 10 ते 10.15 वाजता एलसीसीआयए हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील हे हेल्थकेअरबद्दल माहिती विषद करतील. 10.15 ते 10.55 वाजेदरम्यान मेडिको लीगलबाबत पहिले सत्र पार पडणार आहे. 10.55 ते 11.05 वाजेदरम्यान विविध पुरस्कारांचे मान्यवरांच्याहस्ते वितरण केले जाईल. त्यात जीवनगौरव पुरस्कार (लाईफ टाईम एचिव्हमेंट) पुरस्कार डॉ. विश्वनाथ कोल्हे यांना, हेल्थकेअर आयकॉन डॉ. सुभाष चौधरी, व्हर्सटाईल पर्सोनेलिटी ऑफ हेल्थकेअर डॉ. उल्हास पाटील यांना प्रदान केला जाणार आहे. 11.25 ते 11.55 वाजेदरम्यान युआरडी ग्रुपचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर दुसर्या सत्रात 11.55 ते 12.35 वाजेदरम्यान मार्केटिंग इन हेल्थकेअर, तसेच 12.35 ते 2.20 वाजेदरम्यान हाऊ टू क्रिएट ब्रॅण्ड याबाबत मार्गदर्शन केले जाईल. या सत्रानंतर 2.20 ते 2.40 रोल ऑफ आयटी हेल्थकेअर आणि 2.45 ते 3.00 वाजेदरम्यान आणखी सत्र पार पडेल.