एल.के.फाउंडेशनची दहिहंडी रद्द

0

जळगाव:शहराच्या दहिहंडी उत्सवाचे प्रमुख अाकर्षण बनलेल्या एल. के. फाउंडेशनतर्फे दरवर्षी होणारे दहिहंडी उत्सव यंदा रद्द करण्यात अाला अाहे. अायाेजनावर लागणारा तीन लाख रुपयांचा निधी केरळ येथील पुरग्रस्तांना पुर्नवसनच्या कामासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी महापाैर ललीत काेल्हे यांनी शनिवारी दिली.

एल. के. फाउंडेशनतर्फे दरवर्षी शहराचा विस्तारीत भागासाठी अागळा-वेगळा दहिहंडी उत्सव अायाेजित करण्यात येताे.

यंदाही सागरपार्क येथे दहिहंडीचे अायाेजन करण्यात येणार हाेते. त्यासाठी नियाेजन महिनाभरापासून करण्यात येत हाेते. दरम्यान, केरळला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: जाऊन पुरग्रस्तांना मदत केली. यापासून प्रेरणा घेऊन दहिहंडीचा उत्सव रद्द करून केरळच्या मदतीसाठी लवकरच जलसंपदा मंत्री महाजन यांच्याकडे तीन लाखांचा धनादेश देणार असल्याचे अध्यक्ष काेल्हे यांनी सांगितले. 


तरुणींचे पथकही फोडणार दहीहंडी गोकुळाष्टमीला युवाशक्ती फाउंडेशन व विद्या इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात सकाळी ११ ते १.४५ या वेळेत तरुणींची दहीहंडी आयोजित केली आहे. शिवगंध ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी फोडण्यात येईल, अशी माहिती विराज कावडिया यांनी दिली.