नवी दिल्ली । भारतीय संघातील डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. वाढते वय आणि बिघडत चाललेला फॉर्म पाहता, अनेकांनी युवराजला निवृत्तीचा सल्ला दिला. मात्र्र, 36 वर्षीय युवराज सिंहने भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा अजून सोडलेली नाही. युवराज सिंगने निवृत्तीबद्दल खुलासा करताना आपल्यात अजूनही काही वर्षे क्रिकेट बाकी असल्याचे वक्तव्य केले आहे तसेच आपण अजूनही 2 ते 3 आयपीएल खेळणार असल्याचे त्याने सांगितले. युवराजने आपल्यात अजूनही क्रिकेट बाकी असल्याचे वक्तव्य केले. मला तेव्हाच निवृत्त व्हायला आवडेल, जेव्हा मला वाटेल की सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. मी अजूनही भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असेही युवराजने म्हटले.
स्वत:च्या अटींवर होणार निवृत्त कित्येक दिवसांपासून युवराज संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. युवराज सिंगने सांगितले की, अजूनही बरेच वर्षे मी क्रिकेट खेळण्याची हिम्मत ठेवतो. कॅन्सरवर मात केल्यानंतर अनेकदा युवी संघात कधी आत तर कधी बाहेर राहिला आहे. मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्या सारख्या फलंदाजीमुळे युवीला पुन्हा संघात येणे थोडे कठीण झाले आहे.नुकतच युवराज सिंहने आपल्या निवृत्तीबाबत एक वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, त्याच्या अटींवर क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. एवढेच नाही तर संघात पुन्हा येण्याची इच्छा अद्याप त्याने सोडलेली नाही. तसेच युवराजने हेदेखील सांगितले की, अजून 2-3 सीझन आयपीएल खेळणार आहे. डाव्या हाथाने आक्रमक फलंदाज युवराज सिंगने डिेीीीींंरी ङर्ळींशला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, निवृत्तीनंतर कॉमेंट्री करणे माझ्यासाठी शक्य नाही.