एव्हीएम मशीन विरोधातला प्रस्ताव रद्द

0

पुणे । ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी, अशा अर्थाचा स्थायी समितीपुढे ठेवण्यात आलेला ठराव मंगळवारी एकमताने रद्द करण्यात आला. आश्चर्य म्हणजे निवडणुकांचा निकाल लागल्यावर ईव्हीएम मशिन पद्धतीवर आवाज उठवणार्‍या विरोधी पक्षांनीही हा ठराव रद्द होत असताना आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे भाजप ईव्हीएम मशिनच्या मदतीने नाही तर स्वतःच्या बळावर निवडून आल्याचे सत्ताधार्‍यांनी मान्य केल्याचे स्पष्ट आहे.

23 फेब्रुवारी 2017 रोजी 2017 ते 2021 या पंचवार्षिक निवणुकीचा निकाल लागल्यावर अनेक मातब्बर पराभूत उमेवारांनी पराभवास ईव्हीएम मशिन जबाबदार असल्याचा आरोप केला होता. महापालिकेच्या 2012 ते 2017 च्या लोकप्रतिनिधींच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेतही ईव्हीएम घोटाळ्यावर भाषणे करण्यात आली. याबाबत तत्कालीन सभासद दिपाली ओसवाल, अविनाश बागवे, अश्विनी कदम, सुमन पठारे आणि आरती बाबर यांनी पुढील महापालिकेच्या सर्व निवडणूका ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतदान पत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी मागणीचा ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. संबंधित ठराव मार्चपासून कार्यपत्रिकेवर होता. अनेकदा हा ठराव पुढे घेण्यात येत होता. अखेर तो सर्वपक्षांच्या संमतीने दफ्तरी दाखल करण्यात आला. निवडणूक झाल्यावर भाजप वगळता ज्या पक्षांनी ईव्हीएम विरोधी मोहिमेला पाठिंबा दिला होता. पण आता वेळ आल्यावर त्यातील कोणीही विरोध न करता गप्प बसणे पसंत केल्याचे दिसत आहे.