मुंबई : झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आता सरकारने एसआरए प्रकल्पांची ऑन लाइन नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. ज्यामुळे या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता वाढेल, तसेच निविदा प्रक्रियेतही सुस्पष्टता येईल, असा विश्वास सरकारला वाटत आहे.
येत्या महिनाभरात ही पद्धत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एसआरएला अर्ज सादर करणे, कागदपत्रे पडताळणे, प्रकल्पाला अंतिम मंजुरी देणे इत्यादी सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याचे सरकारच्या सूत्रांनी सांगितले आहे. मागील 21 वर्षांत केवळ 1 लाख 53 हजार नागरिकांचे पुर्नवसन करण्यात यश आले आहे. अवघी 3 लाख घरे या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या धीम्यागतीलाहे प्रकल्पातील भ्रष्टाचार कारणीभूत आहेत.
भाजपा सरकारविरोधी बातम्यांविषयी वस्तुस्थिती स्पष्ट करा
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची प्रवक्त्यांना सूचना
भारतीय जनता पार्टीची प्रवक्त्यांची टीम सक्षम असून प्रवक्त्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात पेरलेल्या खोट्या बातम्यांविषयी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेल्या भाजपा प्रवक्ते व चर्चा प्रतिनिधींच्या शिबीराचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते.
मा. खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकार व राज्य सरकार चांगले काम करत आहे. अशा स्थितीत भाजपाच्या सरकार व संघटनेच्या विरोधात पेरल्या जाणार्यात खोट्या व बदनामीकारक बातम्यांविषयी वस्तुस्थिती स्पष्ट करण्यावर प्रवक्त्यांनी भर द्यावा.
ते म्हणाले की, भाजपाकडे चांगले प्रवक्ते आहेत. प्रवक्त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पक्ष व सरकारची बाजू मांडण्यासोबतच विविध वृत्तपत्रातही लेखन करावे. रोज चर्चेला येणारे अनेक विषय ध्यानात घेता चौफेर वाचन करण्याची व विविध संदर्भांचा संग्रह वाढविण्याची गरज आहे.
रविवारच्या सकाळच्या सत्रात भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा व संवादतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी व ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबीराचे उद्घाटन शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपा प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांनी पक्षाचे प्रवक्ते व चर्चा प्रतिनिधी यांच्याशी संवाद केला..