शिरपूर । तालुक्यातील दहिवद गावाच्या शिवारात असलेल्या प्रोग्रेसिव्ह रूरल इन्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेच्या जमिनीबाबत सूरज तुकाराम बाविस्कर यांनी केलेले अपील प्रांताधिकारी नितीन गावंडे यांनी मंजूर केले आहे. ही जमीन तुकाराम बाविस्कर यांच्या नावावर करतांना आपल्या खोट्या सह्या केल्याबाबत हे अपील दाखल करण्यात आले होते.
शिरपूर पोलिस ठाण्यातही फिर्याद दाखल
सूरज बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवद शिवरातील गट नं. 290/2 ही जमीन शिवबा खंडू गवळी यांच्या मालकीची होती. ती बाविस्कर कुटूंबाने संयुक्तरित्त्या खेरदी केली. त्यांनतर 2013 मध्ये ही जमीन प्रोग्रसिव्ह रूरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी या संस्थेला भाडेपट्टयावर देण्यात आली. तेथे एसआरबी इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम करण्यात आले. मात्र, 2015मध्ये सूरज बाविस्कर यांच्या खोट्या सह्या करून सदर शेतजमीन तुकाराम सदाशिवशेठ बाविस्कर यांच्या नावावर करण्यात आली. याबाबत प्रांताधिकार्यांकडे सूरज बाविस्कर यांनी अपील दाखल केले. तसेच शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली.
उपविभागीय अधिकार्यांसमोर कामकाज
या दाव्याचे कामकाज उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे यांच्यासमोर चालवण्यात आले. त्यावर 25 मे रोजी प्रांताधिकार्यांनी निकाल दिला. यात या प्रकरणास 8 जानेवारी 2016 रोजी दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, सूरज बाविस्कर यांचा अर्ज गुणवत्तेनुसार मंजूर करावा, मालमत्तेची फेरनोंद करण्यासंदर्भांतील 17 नोव्हेंबर 2015 रोजी पारीत आदेश व त्याअनुषंगाने घेण्यात आलेली फेरनोंद क्र. 4882 रद्द करावी असे आदेश प्रांताधिकार्यांनी दिले आहेत. यामुळे तुकाराम बाविस्कर यांच्या नावावर झालेली फेरनोंद रद्द करण्यात आली आहे असे सूरज बाविस्कर यांनी कळविले आहे.